मुंबई : प्रतिनिधी
महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील नागपाडा परिसरात एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी घडली. या ढिगार्याखाली चार जण अडकल्याचे वृत्त असून बचावकार्य सुरू आहे.दक्षिण मुंबईतील नागपाड्यात असलेल्या शुक्लाजी मार्गावरील तीन मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेल्या ढिगार्याखाली चार जण अडकले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य हाती घेतले.