Breaking News

मुरूड समुद्र किनार्याची स्वच्छता

अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचा उपक्रम

?

मुरूड ः प्रतिनिधी

पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी व समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ही स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्यात आली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविद्यालय व परिसराची स्वच्छतेसह मुरूड शहरातील प्रसिद्ध समुद्र किनार्‍याची स्वच्छता करण्याचे कार्य विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. बाहेरून येणारे पर्यटक समुद्र किनार्‍यावर प्लास्टिक तसेच इतर वस्तू सोडून जातात. त्याचा ढीग किनार्‍यावर जमा होतो. त्यामुळे तो परिसर अस्वच्छ बनतो. यासाठी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विश्रामधाम ते परेश हॉटेल येथील समुद्र किनार्‍यावरील जमा असलेल्या कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. साजिद शेख व डीएलएलई विभागप्रमुख प्रा. सोनाली पवार यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांमध्ये उजमा उलडे, हदिया खतीब, इफ्रा दाते, नमिरा कागदी, आयेशा शेणवी, नीलिमा दिवेकर, जीविता पाटील, स्वाती चव्हाण, सनोबर झोंबरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply