Breaking News

घंटानाद आंदोलन

पनवेल : मंदिरे खुली करावीत, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश भाजपचे निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटील आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळील महादेव मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

शेलघर (ता. पनवेल) : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.

करंजाडे : भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, भाजप नेते सुनील साबळे, करंजाडे ग्रामपंचायत सदस्य नाथा भरवाड, बूथ अध्यक्ष गणेश मोरे, अजय साबळे, प्रीती शहारे, शीतल जेठवाल, अशोक विखारे, संतोष प्रबलकर, आतिश साबळे, गणेश प्रबलकर, बाळा घाडगे व कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले.

कामोठे : येथील मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत सेक्टर 35 येथील पुरातन श्री गणेश मंदिरात घंटानाद आंदोलन केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, सरचिटणीस सुशील शर्मा, सामाजिक कायकर्ते प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष वनिता पाटील आदी उपस्थित होते.

कळंबोली : प्रभाग 8 मधील श्री स्वामी समर्थ मंदिर व मंगलेश्वरी माता मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, प्रभाग 8चे अध्यक्ष प्रकाश शेलार, शहर उपाध्यक्ष प्रियंका पवार, सचिव बायजा बारगजे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कमल कोठारी, वाहतूक सेलचे कोकण प्रदेश अध्यक्ष सितू शर्मा, मनीष अरबट, सचिव संतोष गायकवाड, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, शहर मंडल अध्यक्ष गोविंद झा, युवा नेते श्रीकांत ठाकूर, सुलोचना राजपूत, हेमलता घोडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply