Breaking News

रायगडात पावसाची संततधार; जनजीवन विस्कळीत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसर्‍या दिवशीही कायम होता. शनिवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 81.31 मिलीमीटरच्या सरासरीने एक हजार 300.90 मिमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या विविध भागांंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये माथेरान येथे सर्वाधिक 148.80 मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल पनवेल 122, माणगाव व सुधागड प्रत्येकी 105, खालापूर 98 कर्जत 97, मुरूड व रोहा प्रत्येकी 75, तळा 74, उरण 72, म्हसळा 65, पेण 60, महाड 58, पोलादपूर 54, अलिबाग 53 आणि श्रीवर्धन 38 मिमी असा पाऊस पडला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply