Breaking News

हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांचा उच्छाद

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. 90 टक्के झाडे मोडून पडुन गेली आहेत. त्यामुळे बागायतदारांना नवीन लागवड करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांनी प्रचंड उच्छाद मांडला असून नवीन लागवडीसाठी आणलेली माडाची रोपे माकडांनी फस्त केली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे हरिहरेश्वर मंदिर बंद आहे. याच परिसरात खूप मोठ्या प्रमाणावरती माकडे असतात. येणारे पर्यटक किंवा भाविक या माकडांना नेहमीच काही ना काहीतरी खायला देत असत. त्यातच चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे व फळझाडे देखील उद्ध्वस्त झाल्यामुळे माकडांना खाण्यासाठी काहीही शिल्लक नाही. त्यामुळे माकडांनी आता थेट हल्ला चढवला आहे.

प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे वाकणकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले आहे. तरी श्रीवर्धनचे वनक्षेत्रपाल यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन माकडे पकडण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी या परिसरातील बागायतदारांना मधून केली जात आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply