नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांची मुदत 31 मार्चपर्यंत वैध आहे त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारांनी निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही गडकरी यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका आरटीओ व लक्षावधी वाहनचालकांनाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी वाहनचालकांसाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात देशभरात टोलवसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय गडकरींनी घेेेतला होता.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …