Breaking News

दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप

उरण : वार्ताहर

आपल्या लाडक्या भक्तांनी सेवा केल्यानंतर 10 दिवसांच्या गणपती बाप्पाला मंगळवारी (दि. 1) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषद हद्दीत विमला तलाव, भवरा तलाव, मोरा जेट्टी आदी ठिकाणी भक्तांना गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी त्रास होऊ नये चांगली व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जन ठिकाणी उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांनी गणपती मूर्ती विसर्जन ठिकाणी भेट देऊन विसर्जन कसे चालले आहे, त्याबद्दल माहिती घेतली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिक-ठिकाणी, तसेच विमला तलाव येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply