नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील 810 घरांसाठी दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत 26 नोव्हेंबर 2019 रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. 26 एप्रिल 2020 रोजी ुुु.लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच कळविण्यात येईल.
तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-2018 अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील 14,838 परवडणार्या घरांची योजना 13 ऑगस्ट 2018 रोजी जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत 2 ऑक्टोबर 2018 रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. तथापि, काही अर्जदारांनी घरे सरेंडर/रद्द केली तर काही अर्जदार कागदपत्रे छाननी अंतर्गत अयशस्वी ठरल्याने प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात आली.
सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, नवीन पनवेल (प.), सीबीडी बेलापूर येथील नऊ भूखंड (निवासी + वाणिज्यिक वापर) आणि वाशी येथील दोन भूखंड (वाणिज्यिक वापर) ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे 18 जानेवारी 2020 रोजी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांपैकी नवीन पनवेल (प.) व खारघर येथील आठ महत्तम बोलीधारकांना भूखंडांचे वापटपत्र कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बोलीधारकांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे.