Breaking News

गुड न्यूज! मान्सून यंदा वेळेवर

हवामान विभागाचा नवा अंदाज

मुंबई : प्रतिनिधी
उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या देशवासीयांना दिलासादायक बातमी आहे. मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा मान्सून 1 जूनपर्यंत केरळात दाखल होऊ शकतो, असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात 31 मेपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मान्सून ठरलेल्या वेळेला म्हणजेच 1 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची चिन्हे आहेत. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला नाही, तर उर्वरित भारतातही मान्सूनचे वेळापत्रक बदलते.
अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहोचला आहे. पुढच्या 48 तासांत मालदीवचे आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून, व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वादळाची शक्यता असल्याने केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनार्‍यावर पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना शक्य नाहीय, त्यांना जवळचा किनारा गाठण्यास सांगण्यात आले आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply