Saturday , June 3 2023
Breaking News

श्रीवर्धन -नालासोपारा बसला अपघात, सर्व प्रवासी सुखरूप

म्हसळा : प्रतिनिधी

श्रीवर्धन – नालासोपारा एशियाड बसला पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान समोरून येणार्‍या ट्रकने ठोकर दिली. या अपघातात बसमधील सर्व 44 प्रवासी सुखरूप बचावले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला.   श्रीवर्धन-नालासोपारा एशीयाड बस (एमएच-20,बीएल-3230) मंगळवारी संध्याकाळी पनवेलकडे येत होती. बसमध्ये 44प्रवासी होते. कर्नाळा खिंडीत समोरून भरधाव वेगाने असलेल्या ट्रक (एमएच-06,के-3385) ने बेदरकारपणे एशियाड बसला ठोकर दिली. त्यामुळे बस डिव्हायडरवर गेल्याने कंडक्टर बाजूकडील दरवाजा जाम झाला. वाहक बाबासाहेब ठोंबरे यांनी प्रसंंगावधान दाखवून सर्व प्रवाशाना संकटकालीन दरवाजाने बाहेर काढून मार्गस्थ केले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply