खारघर : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत प्रवीण पालवे यांनी उरण तालुक्यातील खोपटे गावातील शेतकर्यांशी संवाद साधला. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांना विविध शेतीविषयक अॅपच्या माध्यमातून किटक कसे ओळखायचे व त्यावरील औषधांची फवारणी योग्य पद्धतीने कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्लॅन्टीक्स, मेघदूत, ऍग्रोस्टार, शेतकरी मित्र, कृषी गुरू, डॉक्टर किसान यासारख्या अनेक अॅपची माहिती दिली. यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, प्रा. चंद्रशेखर पाटील व कार्यक्रम अधिकारी प्रशांत चंदिले यांचे सहकार्य लाभले. या वेळी वसंत ठाकूर, दीपक पाटील, महेश म्हात्रे, विकी पगडे, कल्पित ठाकूर आदी उपस्थित होते.