उरण : वार्ताहर
दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये साजरा होणारा साखरचौथ गणेशोत्सव यंदा कोरोनामुळे अनेक ठिकाणी साधेपणानेच साजरा करण्यात आला. त्यानुसार सालाबादप्रमाणे उरण नगर परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.5) साखरचौथनिमित्त गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांनी गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी नगरसेवक तथा शिक्षण सभापती रवी भोईर, भाजप कार्यकर्ते हितेश शाह, उरण नगरपरिषद कर्मचारी साखरचौथ गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजेंद्र उमटे, उपाध्यक्ष नितीन कांबरे, सचिव जितेंद्र पाडावे, सहसचिव विशाल स्वामी, खजिनदार प्रशांत पाटील, सहखजिनदार रवी म्हात्रे आदी कर्मचारी उपस्थित होते.