उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात उरण तालुका सेतू केंद्र कित्येक दिवस बंद होते. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी त्रास होत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका सेतू केंद्र सुरु करण्यात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व नागरिक विविध दाखल्यांसाठी येतात उरण तहसिल कार्यालयात गर्दी होऊ नये त्या करिता उरण तहसील कार्यालयाच्या ग्राउंडच्या एका बाजूस प्रशस्त जागेत सेतू केंद्र सुरु केले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेतू केंद्रातून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन किमिलेअर दाखला, डोमासियल दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, शेतकरी असल्याबाबतचा दाखला दाखला आदी प्रकारचे दाखले मिळतील. नागरिकांनी सेतू केंद्रात येतांना प्रत्येकाने मास्क लावावे. सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. रांगेत राहावे, गर्दी करू नये, गोंधळ करू नये. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांनी केले आहे.