पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक व अभेद्य असा सुधागड किल्ला कायम स्वच्छ राहावा यासाठी दुर्गप्रेमी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमुळे सुधागड किल्ल्यावरील प्राचीन भोराई मातेच्या मंदिरात चिखल झाला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील काही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी (दि. 6) एकत्र येत भोराई मंदिराची स्वच्छता करून गाभार्यातील चिखलदेखील साफ केला. सुधागड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी तरुणांची धडपड वाखाणण्याजोगी असून त्यांच्या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेत प्रतीक इंदुलकर, उमेश तांबट, यादनील सावंत, कुंदन पोंगडे, अविनाश तांबट, कल्पेश भोईर, महेश ठकोरे, जितेंद्र बारस्कर, मंगेश ओंबळे आदी तरुण सहभागी झाले होते.