मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत सिग्नल लागल्यानंतर 60 सेकंद थांबण्याचे संयम मुंबईकरांमध्ये नसतं. सिग्नल 10 सेकंदापर्यंत आला की, लगेच हॉर्न वाजवून सुटण्याची घाई मुंबईकरांना असते. आता यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणे थांबेल, अशी
अपेक्षा मुंबई पोलिसांना आहे.
मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरात असणार्या दुभाजकावर असणारी यंत्रणा हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजणार डेसीबल मीटर बसवण्यात येणार आहे. वाहन चालकांकडून वाजवण्यात येणार्या हॉर्नची तीव्रता 85 डेसिबलपेक्षा जास्त झाली. तर सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहन चालकांना जास्त वेळ सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागणार आहे. सिग्नलवर मोठमोठ्याने हॉर्न वाजवण्यापेक्षा संयम ठेवून सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहणे, हे वाहन चालकांना शिकवण्यासाठी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे.