Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीकडून पीपीई किटचे वाटप

रेवदंडा ः प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पीपीई किटचे वाटप करण्यात आले. साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली मांडळा, प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा, उपकेंद्र चेहेर, कोर्लई, वळके येथील कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून पीपीई किटचे वापट करण्यात आले. या वेळी साळाव जेएसडब्ल्यू कंपनीचे पी. आर. प्रमुख एम. बी. प्रसाद, सुभाष सिरोलिया, सीएसआर विभागाचे साळाव विभागप्रमुख राम मोहिते, मुरूड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगताप, प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली डॉ. राजेश्री जगताप, डॉ. नंदगावे, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय वाघमोडे, सीएसआर विभागाच्या अपर्णा पाटील, मंगेश शेडगे, राकेश चवरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा व प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली कर्मचारीवर्ग आदी उपस्थित होते. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली येथे साळाव जेएसडब्ल्यू कंपनीचे पी. आर. प्रमुख एम. बी. प्रसाद यांच्या हस्ते डॉ. राजेश्री जगताप व रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सीएसआर प्रमुख राम मोहिते यांच्या हस्ते डॉ. विजय वाघमोडे यांनी पीपीई किट स्वीकारले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली डॉ. राजेश्री जगताप व प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा डॉ. विजय वाघमोडे यांनी साळाव जेएसडब्ल्यू कंपनीचे पीपीई किट प्रदान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या नियमित सामाजिक दायित्व विभागाच्या वतीने कंपनीच्या आसपासच्या आठ ग्रामपंचायतींमधील एकूण 22 गावांमध्ये गावागावात पाणीपुरवठा, शिक्षणाला सहकार्य, विद्यार्थ्यांना निशुल्क बस सुविधा, तांत्रिक शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण, पर्यावरण आदी विविध स्तुत्य उपक्रम राबविले जातात.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply