पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचे दिसत आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे. सुधागडातील कोरोनाबाधितांची संख्या आता 300पार झाली आहे. सुधागड तालुक्यात कोरोनाचे तब्बल 302 रुग्ण झाले असून आतापर्यंत 182 रुग्ण बरे झाले आहेत. तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली. सुधागड तालुक्यात दिवसागणिक रुग्णसंख्येत भर पडत असल्याने सुधागडवासीय धास्तावले आहेत.तालुक्यातील विविध ग्रामपंचायती कोरोना काळात जबाबदारीपूर्वक काम करीत आहेत. तालुका प्रशासनाचे नियोजनदेखील उत्तम व नीटनेटके असल्याचे दिसते. प्रशासनही योग्य प्रकारे काम करीत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे आणि शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper