रेवदंडा : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांत लॉकडाऊनची घोषणा केल्याने हातावर पोट असलेल्यांची पंचाईत झाल्याची जाणीव लक्षात घेऊन नागाव सरपंच निखिल मयेकर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नागाव ग्रामपंचायत हद्दीतील गरीब व गरजू ग्रामस्थांसाठी किराणा मालाची मोफत तसेच घरपोस सेवा सुरू केली आहे.
सद्यपरिस्थितीत नागाव ग्रामपंचायत परिसरात रोजंदारीवर काम करणारी काही कुटुंबे आहेत. या गरीब कुटुंबांना लॉकडाऊनने नित्याने लागणारे कौटुंबिक जेवणाचे साहित्य कसे खरेदी करायचे या चिंतेने ग्रासले होते. अशा नागाव ग्रा. पं. हद्दीतील गरीब व
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबांना एका महिन्याचे किराणा मालाचे अत्यावश्यक साहित्य पुरविण्याचे सरपंच निखिल मयेकर मित्रमंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले. ही मदत फक्त गरीब व गरजूंना मिळेल, असेही सूचित केले आहे. या गरीब व गरजू कुटुंबीयानी निखिल मयेकर 7507864444 व हर्षदा मयेकर 9921550440 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
तसेच नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून कोरोना-19 या रोगापासून बचाव व संरक्षण होण्यासाठी नागावमधील सर्व जीवनाश्यक वस्तू व सेवा यांची सुरू असलेली ग्रामपंचायत कार्यालय, नागाव पोस्ट ऑफिस, सर्व मेडिकल्स, एटीएम, शासकीय व प्रायव्हेट दवाखाने, रेशन दुकान आदी ठिकाणी दिवसातून दोन-तीन वेळा औषण फवारणी करण्यात येत आहे.
नागाव ग्रामपंचायतीत कोरोनाच्या संकट कालावधीत सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी सरपंच निखिल मयेकर व ग्रा. पं.
सदस्यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सुरू केलेल्या लोकोपयोगी कामाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वच ग्रामपंचायतींनी असे कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशी चर्चा होत आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …