मुंबई :मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनीशनिवारी (दि. 12) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा समाजामध्ये असलेल्या आक्रोशाची कल्पना या वेळी राज्यपालांना देण्यात आली. त्यासोबतच मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भातसुद्धा राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन व यासंदर्भात राज्य सरकारला योग्य त्या सूचना करेन, असे आश्वासन या वेळी राज्यपालांनी मराठा समाजाला दिले. त्याचसोबत मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही राज्यपालांनी केले आहे. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चातर्फे पदाधिकारी विनोद साबळे, प्रशांत सावंत, अॅड. अभिजित पाटील, राजन परब, शंकर पार्सेकर, किरण सावंत आदी उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …