Breaking News

गुजरातमधील व्यावसायिकाची नवी मुंबईत त्रिकुटाकडून फसवणूक

Car thief trying to break into a car with a screwdriver. Car thief car theft.

पनवेल : बातमीदार

कारमध्ये स्पार्किंग होत असल्याचे खोटे सांगून तसेच, कारची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात त्रिकुटाने गुजरात भरुच येथील एका कंपनीच्या मालकाकडून नवी मुंबईत 50 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.अल्पेश गदानी (35) असे या व्यावसायिकाचे नाव असून ते पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीत कामानिमित्त आले होते. तेथून दुसर्‍या दिवशी पहाटे ते गुजरातला जाण्यासाठी निघाले. त्यांची कार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथे आली असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चोरट्याने इशारा करून त्यांची कार थांबविली. त्यानंतर गाडीत स्पार्क होत आहे असे खोटे सांगत या चोरट्याने आपल्या साथीदारांसह गदानी यांना कारचे बोनेट उघडण्यास सांगितले. हे दोघे त्यांना जवळच्या शोरूममध्ये घेऊन गेले. तेथे त्यांचा तिसरा सहकारी होता.

गाडीचा एक महत्त्वाचा भाग नादुरुस्त झाला आहे असे सांगत त्याची किंमत 35 हजार रुपये असल्याचे त्याने सांगितले. दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी या व्यावसायिकाकडून 49 हजार 850 रुपये उकळून पलायन केले. गदानी यांनी गुजरातमध्ये कार दाखवली असता काहीच दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पोलिस तक्रार केली. ही टोळी परराज्यांतील वा अन्य जिल्ह्यांतील कारचालकांची याप्रकारे फसवणूक करत असल्याचे समजचे.

ज्येष्ठ नागरिकाला लुटले

पनवेल : वार्ताहर, बातमीदार

पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून 25 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.

अनंत मढवी (62, रा. लाईन आळी, पनवेल) हे पटवर्धन हॉस्पिटलजवळून आपल्या घरी 25 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन पायी जात असताना अचानकपणे एका अज्ञात लुटारूने त्यांच्याजवळील पिशवी खेचून तो तआंबेडकर पुतळ्याच्या दिशेने पळून गेला. त्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply