पनवेल : रामप्रहर वृत्त
आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने विहंगम योग सेवा सत्संग आणि राष्ट्रीय एकता मंचने देशभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत खारघर सेक्टर 35 येथे
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत व हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास विहंगम योग सेवा सत्संगचे अध्यक्ष नित्यानंद सिन्हा, आर. के. सिन्हा, माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते विनोद घरत, शैलेंद्र त्रिपाठी, जितेंद्र तिवारी, अल्पसंख्याक मोर्चा सचिव मन्सूर पटेल, निर्दोष केणी, महेश पाटील, श्रीनाथ पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना विहंगम योग सेवा सत्संग आणि राष्ट्रीय एकता मंच नागरिकांना आरोग्याचे अमृत देण्यासाठी पुढे येत असून त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. या उपक्रमांतर्गत सेक्टर 35 येथे झाडे लावण्यात आली तसेच प्रत्येक सदस्याला एक झाड देऊन त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …