Breaking News

नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझर; रुग्णांना फळवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांनी त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. यानिमित्त पोलिसांना मास्क व सॅनिटायझर, तर रुग्णांना फळवाटप करण्यात आले.  सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांचे समाजोपयोगी कार्य सुरूच आहे. कोरोनाच्या संकटात यंदा केक कापून वाढदिवस साजरा करणार नाही, असे त्यांनी आधीच ठरवले होते. त्याचप्रमाणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेने सामाजिक भान जपत कोरोना काळात मोलाची कामगिरी बजावणार्‍यांप्रति त्यांनी संवेदना दर्शविली. खांदेश्वर, पनवेल शहर, कामोठे या पोलीस ठाण्यांत अधिकारी, कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले, तसेच खांदा कॉलनीतील जनसेवा आश्रम व पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप झाले. या वेळी नगरसेवक म्हात्रे यांच्यासमवेत राकेश म्हात्रे, प्रवीण पाटील, गणेश म्हात्रे, पांडुरंग मोकल, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर आदी होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply