Breaking News

दक्षिण आफ्रिकेचाही पहिला डाव गडगडला; शार्दुल ठाकूरच्या सात विकेट

जोहान्सबर्ग ः वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली. शार्दुलने सात गडी बाद करून आफ्रिकेच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. पहिल्या डावात द. आफ्रिकेने 229 धावा करीत भारताच्या 202 धावांचा टप्पा ओलांडला. यासह अफ्रिकेने 27 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासमोर पुढील डावात मोठी धावसंख्या उभी करून सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात शार्दूलने एका डावात 61 धावांमध्ये सात गडी बाद करण्याचा पराक्रम गाजवला. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी हरभजन सिंगने 120 धावांत सात विकेट्स घेतल्या होत्या. वाँडरर्सवर 29 वर्षांपूर्वीचा अनिल कुंबळेचा विक्रम शार्दूलने मोडला. येथे 1992-93मध्ये कुंबळेने 53 धावांत सहा विकेट्स घेतल्या होत्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply