पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना महामारीचा मुकाबला करताना संगठन ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य भाजपचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येत आहेत.
या उपक्रमातील सेवा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने खारघरमधील श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड स्कूल येथे आणि भारतीय जनता पक्ष व आमदार महेश बालदी जनसंपर्क मोहोपाडा कार्यालय येथे रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबिर होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी अमर ठाकूर (8767171010), दिनेश खानावकर (9892445252), शेखर तांडेल (9833545777) किंवा चिन्मय समेळ (8767149203) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …