Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये नेत्रतपासणी व चष्मेवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि गरीब, वंचित, दलित, आदिवासी व शेतकर्‍यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. यानिमित्त पनवेल शहर मंडल भाजपच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत गरजू नागरिकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल कोळीवाडा येथे सोमवारी (दि. 14) मोफत नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर घेण्यात आले.
या उपक्रमांतर्गत किमान 70 जणांची तपासणी करून चष्मेवाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या शिबिरात 116 जणांना लाभ मिळाला. नेत्रतपासणी करून त्यांना चष्मे वितरित करण्यात आले. सामाजिक अंतर राखून झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चिटणीस सुनील खळदे, शिक्षक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष किसन पाटील, हारूशेठ भगत, दत्ता पाटील, गणेश भगत, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply