मुंबई : प्रतिनिधी
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईचा विजय झाला. या विजयाबरोबरच मुंबई यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच मुंबईच्या विजयामुळे कोलकात्याचे प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या चार टीम प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. आयपीएलच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये प्ले-ऑफच्या टीम ठरल्या आहेत. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 12 पॉईंट्ससह हैदराबाद चौथ्या क्रमांकाची टीम ठरली. तर 14 सामन्यांपैकी 9 विजय आणि 5 पराभवासह मुंबईच्या खात्यात 18 पॉईंट्स झाले. मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. मुंबईएवढेच विजय आणि पराभव झालेली चेन्नईची टीम नेट रनरेटमुळे दुसर्या क्रमांकावर आणि दिल्लीची टीम तिसर्या क्रमांकावर आहे. मंगळवारी (दि. 7) मुंबई विरुद्ध चेन्नई एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper