वाशी (ता. पेण) : नवरात्रोत्सवानिमित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जि. प. सदस्य वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, वढावच्या सरपंच पूजा पाटील, अशोक पाटील, अॅड. संदेश म्हात्रे आदी होते. या वेळी श्री भवानी जगदंबादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केेले. विश्वस्त कमलाकर म्हात्रे, मधुकर म्हात्रे, अशोक थवई, सूचित म्हात्रे, विष्णू म्हात्रे, नारायण म्हात्रे आदी उपस्थित होते.