Breaking News

शेतकरी मजुरांसाठी शिबिर

कर्जत ः बातमीदार

कर्जत आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी मजुरांना पंतप्रधान किसान योजना व जॉबकार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कशेळे येथे आयोजित शिबिरात 130 आदिवासी वाड्यांमधील कार्यकर्ते आपल्या वाडीतील शेतकरी व मजुरांची कागदपत्रे घेऊन सहभागी झाले होते.

 प्रत्येक वाडीतील दोन कार्यकर्ते याप्रमाणे 130 आदिवासी वाड्यांतील शेतमजूर व शेतकर्‍यांनी आपली उपस्थिती दाखवून फॉर्म भरून घेतले. पंतप्रधान किसान योजनेसाठी 260 व जॉबकार्डसाठी 220 फॉर्म जमा झाले. या वेळी आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष भरत शिद, उपाध्यक्ष मंगळ केवारी, परशुराम दरवडा, सचिव मोतीराम पादिर, जयवंती हिंदोळा, आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य सदस्य जैतू पारधी, काशिनाथ पादिर, सीताराम केवारी, दत्तात्रय हिंदोळे, वसंत ढोले, विजय बांगारे, मधुकर ढोले, जगन पादिर, अर्जुन केवारी, कांता पादिर, प्रकाश केवारी, रामदास केवारी, परशुराम थोराड, किसन वारघडे, जनार्दन सराई, बाळू ठोंबरे, तातू पादिर, गणपत पारधी, काशिनाथ पुंजारा, जगन्नाथ शेंडे आदींसह कर्जत तालुक्यातील आदिवासी तरुण उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply