Breaking News

चौक परिसरात रविवारी विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

चौक : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चौक परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) होत आहे. सकाळी 10 वाजता लोधिवली येथून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी होत आहे. ठोंबरे यांनी सुचवलेली व पाठपुरावा केलेली कामे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आली आहेत.
लोधिवली येथे अंतर्गत रस्ते तयार करणे, तुपगाव स्मशानभूमी रस्ता व जलजीवन योजनेंर्तगत नळ पाणीपुरवठा योजना, हातनोली येथे गणेश घाट रस्ता, वावंढळ, कलोते, पोखरवाडी, आंबेवाडी व काटवन येथे रस्ता, तर ताडवाडी, चिचमाळ, निगरपट्टी, निंबारवाडी, दांडवाडी, बुरुजवाडी, बापदानपाडा येथे नळ पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या विविध विकासकामांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply