अमर ठाकूर यांच्या जन्मदिनाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांचा वाढदिवस रविवारी (दि. 20) सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कळंबोली येथील गुरुद्वारामध्ये 21 हजार रुपयांचा धनादेश अमर ठाकूर यांनी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला.
कळंबोळी येथील गुरुद्वाराने कोरोना महामारीच्या काळात अथक परिश्रम घेत लोकांना मदत करण्याचे कार्य केले आहे. या कार्यामध्ये आपले ही सहकार्य व्हावे या साठी अमर ठाकूर यांनी 21 हजार रुपयांचा धनादेश आपल्या वाढदिवसाचे औचित्यसाधून कळंबोली येथील गुरुद्वारामध्ये दिला आहे.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, अजय बहिरा, राजू शर्मा, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, युवानेते हॅप्पी सिंग, अशोक मोठे, मनराज सिंग, जमीर शेख, गोविंद झा, कामोठे युवा मोर्चा शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जगराज सिंग, पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतामध्ये अमर ठाकूर यांच्या दानशूर वृत्तीचे व गुरुद्वाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे कौतुक केले.