Breaking News

पनवेलमधील सिनियर क्रिकेट टी क्लबच्या हंगामाची सुरुवात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्‍या विजयादशमी अर्थात दसर्‍याच्या दिवशी पनवेलमधील सिनियर क्रिकेट टी क्लबच्या खेळाडूंनी नूतन हंगामाची सुरुवात झाली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नंतर चौफेर फटकेबाजी करीत या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.  पनवेल परिसरातील विविध स्तरातील ज्येष्ठ व तरुण खेळाडू एकत्र येत एचओसी कॉलनी येथील तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावर सराव करीत असतात. क्लबच्या वतीने यंदाच्या नव्या हंगामाच्या शुभारंभास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत माजी कर्णधार प्रदीप पाटील याच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक नितीन पाटील, क्लबचे मार्गदर्शक अ‍ॅड. चंद्रशेखर वाडकर, उद्योजक संजय पाटकर, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, राजेश शेट्टी, डॉ. ययाती गांधी, डॉ. आशिष गांधी, डॉ. नितीन पोवळे, डॉ. सचिन शेठ, रवींद्र राऊत, सागर ठाकूर, डॉ. कुंभार, मिलिंद जोशी, डॉ. कौशिक, खजिनदार राजेंद्र पाटील, सचिन डांगरे, सुखम हॉस्पिटलचे डॉ.संतोष जाधव, कर्णधार सुभाष पाटील, उपकर्णधार प्रमोद पाटील, विजय पाटील, अभिजीत पाटील, संदीप पाटील, प्रताप गावंड, मंदार नाडगौडी, कुणाल सावंत, सुहास देशमुख, प्रफुल्ल पेंडसे, सागर आटवणे, त्रिशूल म्हात्रे, रवी घाडगे, अप्पू कुंभार, श्री. पाटेकर आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिनियर क्रिकेट टी क्लबच्या खेळाडूंना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply