श्रीगाव : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील कमलपाडा येथे 12 जानेवारी रोजी श्रीराम कमलपाडा प्रसन्न यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बालयुवक पेझारी संघ अंतिम विजेता ठरला.
त्यांना 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक विहार धामणपाडा यांना सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक वादल शहाबाज व ए. सी. सी. देहेन यांना प्रत्येकी पाच हजार रुपए व विजयी संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण शहाबाद ग्रामपंचायत सरपंच धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीराम कमलपाडा प्रसन्न मंडळाचे सल्लागार नितीन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीराम कमलपाडा प्रसन्नच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Check Also
कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक
कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …