Breaking News

रायगड जिल्ह्यात 554 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात 554 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 20) झाली, तर दिवसभरात 637 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 258, अलिबाग 69, पेण 43, खालापूर व रोहा प्रत्येकी 36, माणगाव 29, कर्जत 25, उरण 23, महाड 14, म्हसळा व पोलादपूर प्रत्येकी सात, मुरूड तीन आणि सुधागड व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे; तर मयत रुग्ण रोहा तालुक्यात तीन, कर्जत व अलिबाग प्रत्येकी दोन आणि पनवेल, तळा व सुधागड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 41 हजार 532 व मृतांची संख्या 1104 झाली आहे. जिल्ह्यात 34,617 जण कोरोनामुक्त झाल्याने 5811 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …

Leave a Reply