पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेला पनवेल महापालिका हद्दीत सुरुवात झाली आहे. या मोहिमेतंर्गत नेमण्यात आलेल्या पथकाने बुधवारी (दि. 24) तळोजा फेज-1 येथे नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
पनवेल महापालिका हद्दीत माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 233 पथके नेमण्यात आली आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके घरोघरी जाऊन लोकांचा सवेर्र् करणार आहेत. यात नागरिकांची तपासणी करून ज्यांच्यामध्ये कोविड-19ची लक्षणे आहेत त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणता येईल.
या उपक्रमावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक हरेश केणी तसेच निर्दोश केणी, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त समीर जाधव, वनिता पाटील, डॉ. पंकज तितर, वार्ड अधिकारी श्री. भंडारी, आशा बोरसे आदी उपस्थित होते.
देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने तळोजा फेस 1 येथे बुधवारी मोफत चष्मेवाटप शिबिर झाले. या शिबिरास भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक हरेश केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, किरण पाटील, युवा मोर्चाचे विनोद घरत, रमेश खडकर, महिला मोर्चाच्या मोना अडवाणी, निशा सिंग, आशा बोरसे, वनिता पाटील, संध्या शारबिंद्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी चष्मेवाटप करण्यात आले.