Breaking News

डिकसळ पाली वसाहतीमधील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाली नवीन वसाहत येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली होती. या शौचालयाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीकडे केली होती. या मागणीला यश आले असून ग्रामपंचायतीने शौचालयाची दुरुस्ती केली आहे. सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेमुळे डिकसळ पाली नवीन वसाहत येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. स्थानिकांच्या मागणीनुसार मनसेचे स्थानिक पदाधिकारी तुकाराम वारघडे, तेजस तुपे, पंकज बुंधाटे, जितेंद्र रुठे, शैलेश घारे यांनी ग्रामपंचायत सदस्या प्रचिती सचिन गायकर यांच्यामार्फत उमरोली ग्रामपंचायत कार्यालयाला शौचालय दुरूस्तीबाबत निवेदन दिले होते. ग्रामपंचायतीने 2021-2022च्या 15व्या  वित्तीय आयोग निधीमधून हे काम काम मंजूर केले आणि आता ते काम पूर्णत्वास आले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply