Breaking News

महिला दिनी कोण उंचावणार विश्वचषक?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज फायनल

मेलबर्न : वृत्तसंस्था
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 8) भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत कोणता संघ विश्वचषक जिंकून महिला दिन जल्लोषात साजरा करणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अंतिम लढत मेलबर्न मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे, तर भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. त्यात भारताने बाजी मारली. आता अंतिम सामना पुन्हा याच दोन संघांमध्ये होत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सलामीच्या पराभवाचा वचपा काढणार की भारत पुन्हा वर्चस्व गाजविणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply