Breaking News

पनवेलमध्ये 170 नवे कोरोनाबाधित

चौघांचा मृत्यू; 366 रुग्णांना डिस्चार्ज

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 26) कोरोनाचे 170 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 98 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 319 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला असून 47 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात आजचे 98 नवीन रुग्ण आणि आयसीएमआर यादीत यापूर्वी नोंद झालेले पण त्यांचा पत्ता पूर्ण नसल्याने तो सापडल्याने त्यांची शनिवारी नोंद घेण्यात आलेले 588 अशा एकूण 686 रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप, कळंबोली सेक्टर 10 ई वेरोंना सोसायटी आणि खारघर सेक्टर 30 ओवेगाव येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 73, कामोठेमध्ये 117, खारघरमध्ये, नवीन पनवेलमध्ये 117, पनवेलमध्ये 125, तळोजामध्ये 14 जणांचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 18432 रुग्ण झाले असून 16050 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.50 टक्के आहे. 1890 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 402 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 27 नवे रुग्ण

उरण : उरण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळले  असून दिवसभरात चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये बोकडवीरा, वशेणी प्रत्येकी तीन, भेंडखळ, अनुपमा नोफरा नेव्हल स्टेशन करंजा, कोमल नेव्ही नगर नेव्हल स्टेशन करंजा, ओम अपा जरीमरी मंदिराजवळ, केगाव स्कोल फॅक्ट्री जवळ, भवरा एनडीसी कॉलनी, नागाव भूमी कॉम्प्लेक्स, नवघर हनुमान मंदिराजवळ, नवघर एसएससी बिल्डींग, विनायक केगाव दत्त मंदिराजवळ, बोरी पानसरे आळी बोरीपखादी, शिवकृपा अपा गिरी हॉस्पिटल बाजूला, कोप्रोली, एअर फोर्स स्टेशन शेवा, पिरकोन, भवरा उरण डीएससी गेट, बोरी उरण, उरण, बाजारपेठ, म्हातवली, वैभव लक्ष्मी अपार्टमेंट येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1837 झाली आहे. त्यातील 1533 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. 

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply