Breaking News

तळोजा एमआयडीसीत विस्तार प्रकल्पांना मान्यता देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

तळोजा औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र गेल्या काही महिन्यांपासून प्रगती करत असल्याचा दावा तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी तळोजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी त्यांनी महत्वाच्या मुद्यावर बोलताना सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील कारखानदारांच्या क्लियरन्सचे नऊ हजार कोटींहुन अधिक असणार्‍या विस्तार प्रकल्पांना मान्यता द्यावी अशी विनंतीपूर्वक मागणी त्यांनी केली आहे. तसेच या वेळी त्यांनी सांगितले की, येणार्‍या काळात येथील कारखानदारांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे संपर्क साधून विस्तार प्रकल्पाची माहिती जाणून घ्यावी, यासाठी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचा सर्वच कारखानदारांना पाठिंबा राहणार आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए), एमआयडीसी आणि केडीसी एक्वा यांच्या वतीने मेडीएटेमचे स्वागत करीत असताना ऑगस्ट 2008मध्ये नदीच्या काठाच्या काही मीटरच्या अंतरावर असलेल्या तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांना अडचणीत आणणार्‍या राज्य पर्यावरण विभागामार्फत नदी नियामक विभागाने (आरआरझेड) राबविला. उद्योगांना त्यांचे उत्पादन वाढविण्यास किंवा त्यांच्या अनुत्पादक उत्पादनांमध्ये बदल करण्याची परवानगी नव्हती. मात्र तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पाठपुराव्यानंतर उद्योगांना दिलासा मिळाला असून तसे राज्याच्या पर्यावरण विभागाने सप्टेंबरमध्ये आरआरझेडला चिन्हांकित केले. पत्रकार परिषदेसाठी टीआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी (अण्णा), कोषाध्यक्ष एम. एस. एस. शेट्टी, समिती सदस्य राकेश डिसूजा, होन समिती सदस्य तथा केडीसी एक्वाइमिनेटचे जीएम लक्ष्मण पाटील आदींसह एन. एम. वानखेडे, आर. पी. पाटील, दीपक बोबडे, पाटील उपस्थित होते.

एका वर्षानंतर, सीईटीपी, एमपीसीबीच्या कामगिरीची अंमलबजावणी न केल्याने उद्योगांना विस्तारीकरण किंवा वस्तूंसाठी संमती देणे बंद केले. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजपर्यंत ती चालूच आहे. सध्या सीईटीपी क्षमता 22.5 एमएलडी इतकी आहे, त्यामध्ये उद्योगांकडून 18 एमएलडी प्राप्त झाली आहे. तर, 4.5 एमएलडी क्षमता त्वरित उपलब्ध आहे. जून 2020 पर्यंत, अतिरिक्त 5 एमएलडी क्षमता कार्यान्वित होईल, जी उद्योगांना आपला व्यवसाय वाढविण्यास मदत करेल.

-सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply