पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 370 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 26) झाली, तर दिवसभरात 615 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 170, अलिबाग 46, पेण 41, उरण व महाड प्रत्येकी 27, कर्जत 17, खालापूर व माणगाव प्रत्येकी 14, पोलादपूर चार, मुरूड, रोहा व श्रीवर्धन प्रत्येकी तीन आणि सुधागडातील एकाचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात चार आणि कर्जत, मुरूड व महाडमध्ये प्रत्येकी एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 54042 व मृतांची संख्या 1200 झाली आहे. 39,233 जण बरे झाल्याने 4609 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण
पनवेल ः वार्ताहरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने …