Breaking News

नवीन पनवेलमध्ये भाजी खरेदीसाठी नियम पाळून रांग

पनवेल : प्रतिनिधी – रविवार सकाळ म्हणजे सर्वसामान्य माणूस मटणाच्या रांगेत उभा असलेला दिसतो. पण नवीन पनवेलमधील दृश्य मात्र वेगळेच होते. येथील शांतिवन सोसायटीत जुन्नरच्या शेतकर्‍याच्या शेतातील ताजी भाजी खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे  नियम पाळून रांग लागली होती. पनवेल महापालिका आयुक्तांनी सोसायट्यांना दिलेल्या आदेशाचे पालन करीत पदाधिकार्यांनी सदस्यांना शेतकर्‍याच्या शेतातील भाजी आणि फळे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली आहेत.   

नवीन पनवेलमधील सेक्टर 15मधील शांतिवन  सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी त्याबाबत सदस्यांजवळ चर्चा केली असता सोसायटीतील सदस्य असलेल्या सुदरमा चासकर यांनी जुन्नर जवळील शिरवली बुद्रुक येथे राहणारे आपले बंधु भूषण थोरवे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या शेतातील भाजी आणि फळे घेऊन विक्रीसाठी घेऊन येण्यास सांगितले. रविवार 17 मे रोजी पहाटे भूषण थोरवे हे जुन्नरहून भाजी आणि फळे घेऊन नवीन पनवेल सेक्टर 15मधील पी 6 शांतिवन येथे आले. रविवार असूनही ताजी स्वच्छ भाजी नागरिकांनी खरेदी केली व सोसायटीचे पदाधिकारी आणि सुदरमा चासकर यांचे आभार मानले.

लॉकडाऊनमुळे शेतात भाजी फुकट जाणार म्हणून चिंतेत असतानाच बहिणीचा फोन आल्यावर दुसर्‍या दिवशी भाजी घेऊन पनवेलला आलो. आता होणारे नुकसान वाचले याचे समाधान वाटत आहे.

– भूषण थोरवे, शेतकरी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply