खालापूर : प्रतिनिधी
जोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत पाइपलाइनचे काम करण्यात येऊ नये असे सांगत खालापूर तालुक्यातील शेतकर्यांनी महानगर गॅसचे काम रोखले आहे. या संदर्भात शेतकर्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.
महानगर गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाइन कर्जत व खालापूर तालुक्यातूनही जाते, मात्र आमच्या जमिनीचा मोबदला न देता काम सुरू असून, कंपनीला त्याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही. संबंधित ठेकेदार आपल्या बाहुबली वजनाचा फायदा घेत काम रेटून नेत आहे असा आरोप करीत खालापूर तालुक्यातील संतप्त शेतकर्यांनी या लाइनचे काम सोमवारी (दि. 29) बंद पाडले. जोपर्यंत आम्हाला आमच्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे काम करू देणार नाही, असा निर्धार बाधित 17 शेतकर्यांनी करीत तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन दिले.
तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी बाधित शेतकरी मच्छिंद्र पुंडलिक आगिवले, किरण काशिनाथ हडप, हरिश्चंद्र कोंडू हडप, रामभाऊ हडप, बाळाराम पांडुरंग हडप, रामदास गोपाळ हडप, गणेश शंकर हडप, मारुती धर्मा हडप आदी उपस्थित होते. आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाहीत तोपर्यंत रस्त्याच्या बाजूच्या खोदकाम व गॅस पाईपलाईनचे काम करू देणार नाही; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या शेतकर्यांनी दिला आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …