Breaking News

नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर विलगीकरण जागेत हलवावे; भाजप नेते राजेश गायकर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर आयसोलेटेड एरियात हलवण्यात यावे, अशी मागणी राजेश नारायण गायकर, सरचिटणीस पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष, ओ.बी.सी. मोर्चा , रायगड यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदन दिले आहे.

गायकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्यप्रमाणे, पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना ठिकठिकाणी कोरोना सेंटर उभे करीत आहात. असे कोविड सेंटर नागरी वस्त्यांमधून सुरू करणे वा त्यासाठी नागरी वस्त्यांमधील हॉस्पिटलची मागणी करणे संपूर्णपणे चुकीचे आहे. पालिकेस आजमितीस अनेक ठिकाणे व जागा उपलब्ध आहेत. दुसरीकडे सिडको अशी सुसज्ज कोविड सेंटर वाशी, मुंबई, ठाणे या ठिकाणी उभे करून दिले/देत आहेत. असे असतानाही अशा जागांचा वापर न करता वा सिडकोकडे कोविड सेंटरची मागणी न करता नागरी वस्त्यांमध्ये कोविड सेंटर व हॉस्पिटल चालवित आहात, हे अतिशय दुर्दैवी व दुर्भाग्यपूर्ण आहे.

पनवेलमध्ये अनेक, खेळांची मैदाने वा स्टेशन समोरील पार्किंग्स असतील वा शासनाच्या एफएसायच्या नेक्सऑन वा बालाजी सिंफनी या इमारती आज बंद अवस्थेत आहेत, या जागा उपलब्ध असतानाही विनाकारण नागरी वस्त्यांमध्ये कोविड सेंटर उभारत/प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण बिल्डिंग क्वारंटाइन करता, बिल्डिंगला बांबू बांधता. बिल्डिंगमध्ये जाण्यास व येण्यास लोकांना मनाई करता आणि थोडक्यात तेथील लोकांना आयसोलेट करता. मग कोविड सेंटर नागरी वस्त्यांमध्ये कसे उभे करू शकता, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

 नागरी वस्त्यांपासन आयसोलेटेड अशा सिडकोच्या उपलब्ध पार्किंगच्या जागा, सिडकोकडे उपलब्ध असलेले मोकळे भूखंड, हॉटेल्स अशा जागेत अशी कोविड सेंटर उभारावीत तरच खर्‍या अर्थाने क्वारंटाइन वा आयसोलेशन शब्दांना काही अर्थ राहिल अन्यथा आपले हे निर्णय तुघलकी ठरण्याची दाट शक्यता आहे आणि नागरीवस्त्यांमधील कोविड सेंटरमुळे जर आजूबाजूस नसलेला कोरोना आढळून आला तर त्याचे पातक पालिकेस लागु शकते.

दरम्यान, गायकर यांच्या मागणीला स्थानिक नागरिकांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळत असून महानगरपालिका आयुक्त यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply