टोकियो ः वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ब्रिटनला 3-1ने पराभूत केले. भारतीय संघ आता सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास चार दशकानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून 1-7ने पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. अ गटातील पाचपैकी चार सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता ग्रेट ब्रिटेनला पराभूत करीत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला 3-1 अशी धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी उल्लेखनीय आहे. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडशी अटीतटीचा सामना झाला. सामना 2-2ने बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय लागला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …