Breaking News

वृक्षलागवडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी

वारणा उद्योग समूहाचे मालक, जनसुराज्य पक्षप्रमुख डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्ले (चौक) कातकरीवाडीत कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या वतीने वाडीत औषधी वनस्पतींची लागवड करून आदिवासी बांधवांना 500पेक्षा जास्त विविध जातींच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. सीताफळ, आवळा, जाम, बेल, कोरफड, वड, पिंपळ आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले. या वेळी कानसा वारणा फाऊंडेशनचे खजिनदार रामदास पाटील, सुमिता पाटील, भावना पाटील आदी उपस्थित होते. तसेच कानसा खोर्‍यातील गावांत धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, युवा अध्यक्ष महेंद्र पाटील, दीपकृष्ण पतसंस्थेचे मॅनेजर तानाजी पाटील, संपदा कुलकर्णी, प्रकाश पाटील, किरण पाटील, भीमराव पाटील, महेश पाटील, शरद पाटील, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply