Breaking News

उरणमधील डीपी धोकादायक अवस्थेत

उरण ः वार्ताहर

उरण शहरात महावितरण कंपनीच्या डीपी उघड्या अवस्थेत दिसत आहेत. काही ठिकाणच्या डीपी मोडकळीस आल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जीवितहानीही होऊ शकते. या गंभीर बाबीकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्या अनुषंगाने या समस्येकडे संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. उरण शहरातील स्टेट बँक ऑफ  इंडियाजवळ, वाणी आळी कॉर्नर, फॅशन वेस्टर्न आऊट फिटसमोर, दशश्री माळी हॉलजवळ, महात्मा गांधी पुतळ्याजवळ, वाणी आळीसमोर आदी ठिकाणी महावितरण मंडळाच्या डीपी उघड्यावर आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मोडकळीस आलेल्या डीपी बदली कराव्यात तसेच उघड्या डीपी सुव्यवस्थित बंद कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply