एकाचा मृत्यू; 286 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 9) कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 196 रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 231 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 55 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 196 नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 11 शुभनील शिवम येथील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 35 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3343 झाली आहे. कामोठेमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4779 झाली आहे. खारघरमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4720 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 33 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3886 झाली आहे. पनवेलमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3608 झाली आहे. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 811 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 21147 रुग्ण झाले असून 18911 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.43 टक्के आहे. 1746 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 490 जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये आठ जणांना लागण
कर्जत : कर्जत तालुक्यात शुक्रवारी एका पोलिसासह आठ कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत तालुक्यात 1695 रुग्ण आढळले असून 1547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 60 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांत नेरळ नजीकच्या धामोते चार, कर्जत, शेलू, नेरळ, गौळवाडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उरण तालुक्यात 10 नवे रुग्ण
दोघांचा मृत्यू; 17 जणांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले असून 17 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दिवसभरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये एनएडी करंजा तीन, मुळेखंड तेलीपाडा, डोंगरी, म्हात्रेवाडी करंजा, पाटीलपाडा खोपटे, जसखार, सीआयएसएफ उरण, क्लासिक रेसिडेन्सी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर बोरी पानसरे आळी बोरीपखादी उरण व चीर्ले जासई रेल्वे कॉलनी उरण येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1953 झाली आहे. त्यातील 1735 रुग्ण बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.