Breaking News

डिव्हिलियर्सकडून बुमराहचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गोलंदाजांच्या वन-डे रँकिंगवर नजर टाका. जसप्रीत बुमराह जगात अव्वल स्थानी असल्याचे तुम्हाला दिसेल आणि आकडे कधी खोटे सांगत नाहीत. बंगळुरूमध्ये आयपीएलच्या चुरशीच्या लढतीत अंतिम टप्प्यात तो माझ्या तुलनेत सरस ठरला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सला या रंगतदार लढतीत सहा धावांनी विजय मिळवता आला. याचे सर्व श्रेय बुमराहला जाते. त्याने शानदार मारा केला, अशा शब्दांत बंगळुरूचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने बुमराहचे कौतुक केले.

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, आमच्यासाठी या लढतीचा शेवट निराशाजनक ठरला. काय करायला हवे, हे मला कळलेच नाही. आयपीएल लढतीत अखेरपर्यंत नाबाद राहिल्यानंतरही संघाला पराभव स्वीकारावा लागण्याची ही पहिलीच वेळ होती. मुंबईने 187 धावांची मजल मारली. त्यांनी आक्रमक सुरुवात केली, पण आम्ही नियमित अंतरात बळी घेत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो. लक्ष्याचा पाठलाग करतानाही अखेरच्या पाच षटकांत आम्हाला 61 धावांची गरज होती आणि 7 फलंदाज शिल्लक होते. एक मोठे षटक आम्हाला लढतीत कायम ठेवणार होते. त्यानंतर बुमराहने चेंडू घेतला. त्याच्याकडे विशेष कौशल्य आहे. तो मनगटाच्या जोरावर काहीतरी करीत असावा किंवा आणखी काही वेगळे करीत असावा. मी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये यापूर्वी अशी गोलंदाजी कधीच खेळलो नाही. दडपणाखाली अनेक खेळाडू गोंधळतात, पण बुमराह रणनीतीवर कायम असतो. आम्हाला अखेरच्या 3 षटकांत 40 धावांची गरज होती. 18व्या षटकांत आम्ही 15 धावा वसूल करण्यात यशस्वी ठरलो, पण 19व्या षटकांत बुमराहने अचूक मारा कायम राखला. मी त्याला लक्ष्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने माझा पाठलाग करीत यॉर्कर चेंडू टाकला, असेही डिव्हिलियर्सने नमूद केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply