Breaking News

जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू

45 हेक्टर क्षेत्रामध्ये 1538 ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्किंगची क्षमता

उरण : प्रतिनिधी

कोरोनामुळे सुरू करण्यात अडथळा निर्माण झालेला जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा अखेर सुरू करण्यात आला आहे. सुमारे 45 हेक्टर क्षेत्रामध्ये 170 कोटींची गुंतवणूक करुन विकसित केलेल्या या पार्किंग प्लाझामध्ये एकाच वेळी 1538  ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्क करण्याची क्षमता आहे.

या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामुळे जेएनपीटी परिसरातील विविध दुतर्फा रस्त्यांवरच अनधिकृतपणे पार्किंग करुन ठेवण्यात येणार्‍या ट्रॅक्टर ट्रेलर्सची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असलेली वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त जेएनपीटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जेएनपीटी बंदरातुन दररोज सुमारे 14 हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र आवश्यकतेनुसार जेएनपीटी परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर- ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. अपुर्‍या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे बंदराबाहेरच्या अनेक दुतर्फा रस्त्यांवरच अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात.

परिणामी अवैधरित्या करण्यात येणार्‍या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. शिवाय यामुळे परिसरातील नागरिकांबरोबरच वाहतुकदार, आयात-निर्यातदार आणि बंदराचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. जेएनपीटी बंदरात आयात-निर्यात व्यवसाय आणखी सुलभरित्या करता यावा यासाठी आता जेएनपीटीने सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाची उभारणी करण्यात आली आहे.

या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा विकास फॅक्टरी स्टफ्ड निर्यात कंटेनर वाहून नेणारे ट्रॅक्टर ट्रेलर्स जे सध्या विविध ठिकाणी पार्किंग केले जातात. त्यांच्या एकत्रित पार्किंगसाठी या प्लाझाचा उपयोग होणार आहे. पार्किंग प्लाझामधील अत्याधुनिक सुविधा आणि सेवा तरतुदींमुळे कस्टम विभागाशी संबंधित दस्तऐवज प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण केली जाऊ शकणार आहे.

या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामधील ट्रॅक्टर ट्रेलरना त्याच्या पार्किंगच्या ठिकाणी व्हेरिएबल मेसेजिंग चिन्हे, इतर चिन्हे वापरुन मार्गदर्शन केले जात आहे. एकदा एक्सपोर्ट ऑर्डर (एलईओ) जारी झाल्यानंतरच ट्रॅक्टर ट्रेलर संबंधित एक्झिट गेटमधून पार्किंग प्लाझामधुन बाहेर जाऊ शकणार आहेत. यामुळे तस्करी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मौलिक मदतच होणार असल्याचा दावा ही जेएनपीटी बंदर प्रशासनाकडून केला जात आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply