Breaking News

उलवे नोडमध्ये भव्य सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जागतिक पर्यावरण दिन आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोडमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व उलवे सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायक्लोथॉन स्पर्धा होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 25) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाली. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, युवा कार्यकर्ते किशोर पाटील, तसेच शेखर काशीद, सचिन आवटे, पल्लवी सुर्वे, सरोज मानवतकर, गुड्डू कनोजिया, अनिल सनस, अमित झा, विकी भिडे, मनोज सिंग, वंची सोम्सकंदन, ओमकार कदम, सरोज, फरहान, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यालयीन सरचिटणीस अनिल कोळी आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply