Breaking News

दुय्यम वागणूक सहन करणार नाही!; माणगावात शिवसेनेच्या सभेत तटकरेंना इशारा

माणगाव : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना कोणी आपल्याला दुय्यम वागणूक देत असेल, तर ते सहन होणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेनेचे दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी नाव न घेता तटकरे कुटुंबीयांना दिला आहे. माणगाव तालुका शिवसेनेची आढावा सभा शुक्रवारी (दि. 30) कुणबी भवनात दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेला श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, दक्षिण रायगड युवा सेना जिल्हाधिकारी विकास गोगावले, जिल्हा परिषद सदस्य अमृता हरवंडकर, स्वाती नवगणे, माजी उपाध्यक्ष संजीव जोशी, डॉ. संतोष कामरेकर, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य नथुराम करकरे, प्रमुख अजित तारलेकर, माजी सभापती राजेश पानावकर, सुजित शिंदे, उपसभापती महेंद्र तेटगुरे, नगरसेवक सचिन बोंबले, युवासेना तालुका अधिकारी कपिल गायकवाड, महिला संघटक अरुणा वाघमारे, विभाग प्रमुख रवींद्र टेंबे, शरीफ हार्गे, उपतालुकाप्रमुख प्रकाश गोरिवले, म्हसळा माजी तालुकाप्रमुख नंदूशेठ शिर्के, सुनील पवार, अनिल सोनार यांच्यासह कायकर्ते उपस्थित होते. या सभेत सर्वच शिवसेना पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील खदखद पुन्हा बाहेर आली आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply